Yojanadoot Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्यत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिका पर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी राज्या मध्ये “मुख्यमंत्री योजनादूत” या भरती प्रक्रिया अंतर्गत 50,000 पदे भरण्यासाठी चा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने “मुख्यमंत्री योजनादूत” या भरतीच्या नावाची घोषणा केलेली आहे. “मुख्यमंत्री योजनादूत” भरती संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
या भरती प्रक्रिये अंतर्गत 50,000 पदांसाठी भरती होणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक शहरांमध्ये ही भरती होणार आहे.ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी 01 आणि शहरी भागा मध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक ‘योजनादूत’ असेल. याप्रमाणे या भरती प्रक्रिया अंतर्गत 50,000 योजना दुतांची निवड करण्यात येणार आहे. या संदर्भातील जीआर हा निर्गमित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी आलेले पहा.
एकूण पद संख्या : 50,000 पदे.
योजनादूत भरती 2024.
उद्दिष्ट : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, व प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरीता “मुख्यमंत्री योजनादूत” थेट ग्रामस्तरा पर्यंत नेमणे.
योजनादूत भरती 2024, पात्रता निकष, पदांचा एकूण तपशील.
पद. क्रमांक.
पदाचे नाव
पद संख्या
1.
योजनादूत
50,000
एकूण पद संख्या
50,000
पात्रता निकष :
1) वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार.
2) शैक्षणिक अहर्ता – कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
3) संगणक ज्ञान आवश्यक .
4) उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
5) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
6) उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
योजनादूत भरती 2024, वयोमर्यादा.
वयोमर्यादा : उमेदवार हा 18 ते 35 वयोगटातील असावा.
योजनादूत भरती 2024, वेतन.
वेतन : मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समाविष्ट)
निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूता सोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
योजनादूत भरती 2024, नेमणूक प्रक्रिया.
Online प्रक्रियेद्वारे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.
जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाअधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक उमेदवारा बरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.
जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशक (Orientation) करतील.
जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील.
योजनादूत भरती 2024, निवड प्रक्रिये साठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे.
1)विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला Online अर्ज.
2) आधार कार्ड.
3) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/ प्रमाणपत्र इ.
4) अधिवास दाखला.(सक्षम यंत्रणेने दिलेला).
5) वैयक्तिक बँक खात्याचा तपशील.
6) पासपोर्ट साईज फोटो.
7) हमीपत्र (Online अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
योजनादूत भरती 2024, निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे :
1) योजनादूत संबंधित जिल्हा व माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
2) प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील.
3) योजनादूत यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धीकरतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.
4) योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करुन तो ऑनलाईन अपलोड करतील.